Month: July 2019

नेमेची येतो मग पावसाळा , तब्येत अशी सांभाळा !

वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नवमेघपंक्ती नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।। काय ना गंमत आहे मित्रांनो. निसर्ग, सृष्टी अनेक प्रकारे, अनेक रुपांनी मनुष्यास सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देत असतात. वरील काव्य पंक्ति खुप जुन्या काळातील आहेत. जुन्या जाणत्या मंडळींना या ओळी अगदी तोंडपाठ असत. यातुन हीच जुनी जाणती माणसे, लहानग्यांना या […]

शरीराच्या वाढलेल्या वजनाचे दुष्परीणाम

एका मित्राचा अचानक फोन आला. अगदी १० वर्षांनी त्याच्याशी बोलणे झाले असावे. सध्या तो नगर मध्ये नसतो. पण गावच्या यात्रेसाठी गावी आला होता व जाताना एकदा भेटुन जावे म्हणुन सहज फोन केला. भेटण्यासाठी जवळच्याच  एका हॉटेल मध्ये गेलो. कॉलेजच्या दिवसातील, तो अगदी तरबेज हुशार आणि चपळ मुलगा. आमच्या ग्रॅड्युएशन च्या काळात, तो नेहमी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये […]

सावकाश होऊ द्या – भाग २

सावकाश होऊ द्या मागील लेखात “सावकाश होऊ द्या” ची भावनिक गरज आणि लोप पावत चाललेली भारतीय ग्रामीण संस्कृती याविषयी आपण पाहीले. जेवण नक्की कसे करावे याविषयी आपले घरातील जाणती माणसे आपल्याला आपण अगदी लहान असल्यापासुनच मार्गदर्शन करीत आली आहेत. आपले दुर्दैव हेच की आपण कधीही त्यांच्या ह्या मार्गदर्शनाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातुन पाहु शकलो नाही. आज मी […]

सावकाश होऊ द्या – भाग १

नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला. कार्यक्रम भलताच भारी होता. काय तो रोशनाई, झगमगाट, केक कापणे सगळे अगदी भारी होते. शुभेच्छाची देवाणघेवाण झाल्यावर, साहजिकच आम्हाला जेवणाचा आग्रह झाला. आम्ही जेवणाच्या टेबलापाशी पोहोचलो. पाहतो तर काय पंचपक्वान्न सोडा, इथे तर ३० ते ४० पक्वान्न होते. सोबत एका कोप-यात चॅट चे वेगळे काऊंटर. आईसक्रीम, […]

X