नेमेची येतो मग पावसाळा , तब्येत अशी सांभाळा !

वैशाखमासी प्रतिवर्षी येती
आकाशमार्गे नवमेघपंक्ती
नेमेची येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।।

काय ना गंमत आहे मित्रांनो. निसर्ग, सृष्टी अनेक प्रकारे, अनेक रुपांनी मनुष्यास सुखी समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देत असतात. वरील काव्य पंक्ति खुप जुन्या काळातील आहेत. जुन्या जाणत्या मंडळींना या ओळी अगदी तोंडपाठ असत. यातुन हीच जुनी जाणती माणसे, लहानग्यांना या सृष्टीकडे पाहण्याची एक नवी दृष्टीच देतात जणु. सृष्टीचे कौतुक जाण बाळा !

सर्वदुर हिरव्याकंच पर्वतराजी, हिरवेगार डोंगर, माळराने हे पाहिल्यावर जणु असे वाटते की पृथ्वीमाते ने हिरवा शालुच नेसला आहे की काय? काय हा उत्सव हिरवाईचा. नगर मधील हा ट्रेक पावसाळ्यात करण्याची मजा काही वेगळीच असते.

तुम्ही शहर सोडुन अजुन ही बहारदार निसर्ग पहायला गेला नसाल तर तुम्ही आयुष्यातील खुप मोठ्या सोहळ्याला मुकला आहात असेच म्हणावे लागेल. वारंवार निसर्गात जाण्याने, निसर्गपर्यटन केल्याने आपणास आपल्या उगमाचे स्मरण होत राहते. व या स्मरणाने आपला दररोजचे शहरी, यांत्रिकी जगणे देखील काही काळाकरता सुसह्य होते.

कित्येकांना पावसात फिरायला जायचे म्हंटल्यवर भीतीच वाटते. याचे कारण असते पावसाळ्यातील आजार. कित्येक जण आजारापणाची परवा न करता जातात देखील पावसाळी भटकंतीला पण नंतरचे काही दिवस मात्र पावसाळी आजारांना हैराण होऊन जातात. तसेही अनेक जण पावसाळ्यातील भटकंती न करताच आजारी पडतात.

तुर्त मी तुम्हाला पावसाळ्यातील आजारांपासुन बचावासाठी काही साधे सोपे उपाय सांगत आहे.

तुम्हाला एक आणखी गंमत सांगतो. जसे सिनेमांचा हाऊसफुल्ल चा काळ शनिवार रविवार असतो तसा इस्पितळांचा हाऊसफुल्ल चा काळ म्हणजे पावसाळा. पावसाळ्यात ओपीडी, आयपीडी, आयसीयु, आयसीसीयु असे सर्वच विभाग अक्षरशः काटोकाट भरलेले असतात मग ते हॉस्पिटल खासगी असो वा सरकारी.

पावसाळ्यामध्ये तुम्हाला दवाखाना वारी टाळायची असेल तर पुढील माहिती अवश्य वाचा.

मुख्य कारण असते दुषित पाणी. दुषित व साचलेल्या पाण्यामुळे पैदा झालेले डास. व त्यामुले होणारे जीवघेणे आजार. हे टाळायचे असतील तर आपल्या घर, परिसराजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या. अर्थात हे सार्वजनिक , सामाजिक काम जरी असले तरी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन चांगल्या गोष्टींची सुरुवात करु शकता, हे नक्की!

या व्यतिरिक्त छुट-पुट तरीही वेळखाऊ, पैसा-खाऊ असे सामान्य आजार पावसाळ्यात अगदी साथी सारखे पसरतात. हे होऊ नये म्हणुन काय करावे?

  • दुषित पाणी पिऊ नये
  • जीभेगचे चोचले, ते ही रस्त्यावरचे वडा-पाव, पाणी-पुरी, असे चोचले पुरवणे त्वरीत थांबवा
  • पचनशक्ति या काळात मंदावते, त्यामुळे पचनास हलके अन्न या काळात घेतले पाहिजे. मांसाहार शक्यतो टाळावा. त्यातही सुकी मासळी खाणे अधिक हितकारक होय. आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
  • घरामध्ये डांसापासुन कुटूंबाचा बचाव करावा. मच्छरदाणी सर्वोत्तम
  • पावसात भिजणे टाळावे. अपरिहार्यच असेल तर किमान डोके व छाती भिजणार नाही याची काळजी घ्यावी. आपला टाळुचा भाग सर्वात जस्त संवेदनशील असतो.व तेथुनच सर्दीचा प्रादुर्भाव आपल्या शरीरात होतो त्यामुळे टाळु भिजणार नाही सर्वात जास्त काळजी घ्यावी
  • जे लोक दुचाकी चालवतात व त्यांना कामानिमित्त फिरताना भिजावेच लागते अशांनी स्वतःचा जांघेमधील(दोन्ही मांड्यांमधील भाग, त्वचा) भागाची विशेष काळजी घ्या. अंडरवेयर ओली असेल तर तिथे फंगल इन्फेक्शन होतेच. यासाठी कमीत कमी आपला जांघेतील भाग ओला राहील याची काळजी घ्या. खाज सुटत आहे असे वाटल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • आणि सर्वात महत्वाचे आजारी जरी पडलात तरी काळजी करु नका. एक दोन दिवस वाट पाहुन, बरे होत नाही असे दिसल्यास डॉक्टरांना भेटा.
  • आणि हो, व्यायाम करणे सोडु नका.

सोबतच पावसाचा, निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या. भरपुर हसा, खेळा, सतत ॲक्टीव्ह रहा. आपल्या पुढच्या पिढीला वरील कवितेच्या ओळी अवश्य सांगा.

या वेबसाईटच्या माध्यमातुन, नगरकरांना सतत तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतु आहे.

चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.

कळावे

तुमचा निरामय आयुष्याचा सांगाती,

सुनिल कोरडे – 98903 93341

मनिषा कोरडे 9922830541

अहमदनगर

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X