वजन कमी करण्यातील चार मुख्य अडथळे

अनेकदा माझ्याकडे अशा व्यक्ति येतात की ज्यांना माझ्या सारख्या तज्ञाची खरतर गरज नसते, कारण त्यांच वजन अजुन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल नसते, तरीही प्रीव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, या उक्तीप्रमाणे, माझ्या कडे आलेले असे लोक, केवळ काळजीपोटी येतात. अशा व्यक्तिंना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते. व ते मी करतोच.

सर्वसाधारणपणे, कुणालाही वजन कमी करण्यातील चार मुख्य अडचणी नेमक्या काय असतात? नेमके हेच आपणा ह्या लेखामध्ये समजुन घेऊयात.

 

  • शारीरीक व्याधी

ज्यांना मधुमेह म्हणजे डायबेटीज आहे अशा व्यक्तिंना वेळोवेळी इंसुलिन घ्यावे लागते. अशा लोकांना हे पक्के माहीत असते की व्यायामातील कमीअधिकपणा, तसेच आहारातील बदल जर चुकले, किंवा वेळापत्रक बिघडले तर, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. तसेच अशा तरुण स्त्रिया ज्यांना पॉलीसिस्टीक ओव्यरीय्न सिंड्रोम नावाची व्याधी असते, त्या बहुंशी वजन कमी करण्याच्या फंदात पडत नाहीत. अश स्त्रियांनी जरी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार जरी केला तरी त्यांचे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात त्यांना फारसे यश येत नाही. एखाद्यास हृद्यरोग किंवा एखादा हार्ट अटॅक येऊन गेलाय अशा व्यक्ति देखील व्यायामापासुन दुर राहणेच पसंत करतात. अनेकदा असेही लोक माझ्या पाहण्यात येतात, की ज्यांना जन्मतःच अपंगत्व आहे किंवा एखाद्या अपघातामुळे अपंगत्व आले आहे. त्यामुळे हात अथवा पायाच्या हालचालींवर मर्यादा येतात. त्यामुळे, त्यांना अनेकदा इच्छा असुन देखील व्यायाम करता येत नाही. या प्रकारच्या अनेक शारीरीक व्याधी वजन कमी करण्यामध्ये अनेकदा अडथळा निर्माण करतात.

  • वेदना

थोडा जरी व्यायाम केला तरी लगेच अंग दुखणे, पाठीचा, पोटाचा व्यायाम करावयास गेल्यावर लगेच पाठ दुखणे, चमक भरणे. तसे पाहता ही समस्या खुप छोटी जरी असली तरी त्याचा परीणाम वजन कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये अडथळा बनतो. पुढे जाऊन ह्या वेदना मानसिक व्याधींना अधिक बळकट करतात. त्यामुळे अशा वेदनांवर लागलीच योग्य डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार करणे अतिमहत्वाचे.

  • आर्थिक समस्या

खरतर ही समस्या नसतेच मुळी. तरीही अनेकदा ब-याच लोकांना पोषक आहारासाठी पैसा खर्च करणे म्हणजे संयुक्तिक वाटत नाही. पोषक आहारामध्ये असे आवश्यक नाही की, तुम्ही खुप महागड्या भाज्या, प्रथिन्युक्त चिकन इत्यादी खाल्लेच पाहीजे. एका साधारण व्यक्तिस किती पोषक तत्वांची गरज असते त्याप्रमाणे, थोडे कमी अधिक, जरी आपण आपल्या शरीरास पुरवु शकलो तरी किमान अवास्तव वजन वाढण्यापासुन तरी आपण बचावले जाऊ शकतो. एकदा का वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले की मग मात्र तुम्हास माझ्या सारख्या एखाद्या तज्ञाचीच गरज पडते. पण अशा वेळी देखील आपल्या आरोग्यापेक्षा आपला पैसा महत्वाचा नसतो. नुकत्याच एका संशोधनात असे आढळुन आले आहे की वाढते वजन, हृद्यविकारास आमंत्रण देत असते. हृद्यविकाराचा झटका, येऊन, त्यावर उपचारांसाठी पैसा आणि वेळा घालवण्यापेक्षा, आपण पोषक आहारासाठी आताच पैसा कारणी लावला तर ते इस्पितळात दाखल होऊन महीनोंमहीने, बेडवर पडुन राहण्यापेक्षा नक्कीच बरे. तर आर्थिक समस्या खरतर नसतेच.

  • मानसिक जडणघडण

माझ्या अनुभवाप्रमाणे, एकदा का एखाद्या व्यक्तिने, वजन कमी करण्यासाठी एखादा विशिष्ट मार्ग ठरवला व तो त्यावर मार्गक्रमण करु लागला . व एखाद दोन महिन्यांनंतर, त्याला असे जाणवले की त्याला अपेक्षित यश मिळत नाहीये. एकदा का असा अनुभव आला की, मग त्या व्यक्तिच्या मनामध्ये, “आपले वजन काही केल्या कमी होत नाही”, असा एक न्युनगंड तयार होतो. व हा न्युनगंड एवढे मोठे रुप धारण करतो की, ती व्यक्ति आपले वजन कधीही कमी होणार नाही, असा एक सिध्दांतच नकळत बनवुन टाकते. हा एक प्रकार झाला मानसिक अडचणीचा. असे अनेक प्रकार आहेत. जसे, एखादे ध्येय ठरविल्यावर, सुरुवातीस तन मन धन पुर्वक स्वःतस त्याकडे झोकुन देणे, पण कालांतराने, आपणच आपल्या ध्येयापासुन दुर होणे. लक्ष विचलीत होणे व आपलेच ध्येय आपल्यासाठी महत्वाचे न वाटणे. हा अगदी सर्वसाधारण अनुभव आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. वजन आणि मानसिक व्याधी ह्या दोन्ही गोष्टी काही लोकांसाठी कोंबडी आधी की अंडे आधी अशा प्रकारचे कोडे असते. पण ह्या कोड्याचे उत्तर आमच्या कडे आहे. वाढणारे वजन, ताण, तणाव, निराशा, नकारात्मक विचारसरणी, इत्यादींना जन्म देते, तर नैराश्य, तणाव नकारात्मक विचार वजन आणखी जास्त वाढण्यास कारणीभुत ठरतात.

तुम्ही जेव्हा केव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न केला असेल, आणि काही कारणास्तव तुमच्या कडुन त्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर, असे नक्की का झाले असावे, याची कारणे कदाचित तुम्हाला समजली असतील. मग विचार कसला करताय. लागा पुन्हा एकदा कामाला. ध्येय ठरवा, आणि ध्येय प्राप्त केल्यावाचुन थांबु नका.

तुमचा निरामय आयुष्याचा सांगाती,

सुनिल कोरडे – 98903 93341

मनिषा कोरडे 9922830541

अहमदनगर

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X