टॉक्सिफिकेशन आणि डीटॉक्सिफिकेशन म्हणजे काय?

खरतर डीटॉक्सिफिकेशन ह्या इंग्रजी शब्दाऐवजी शीर्षकामध्ये मी त्या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द वापरु शकलो असतो. पण शीर्षकामध्येच असा धोक्याची घंटा वाजवणारा शब्द नको म्हणुन मराठी शब्द इथे सांगत आहे. तर डीटॉक्सिफिकेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द विषमुक्ती किंवा विषहरण असा आहे.

डीटॉक्सिफिकेशन हा शब्द आपल्या अनेकदा कानावर पडला आहे, त्यामुळे त्या शब्दाची धार थोडी कमी झाल्यासारखे झाले आहे. डीटॉक्सिफिकेशन हे नैसर्गिक पध्दतीने आपोआप आपल्या शरीरात होत असते. तसेच ज्यावेळी आपल्या शरीरातील विषयुक्त घटक इयके जास्त वाढतात की नैसर्गिक पध्द्त काम करेनाशी होते तेव्हा आपणास बाहेरुन म्हणजे उत्प्रेरकांच्या मदतीने डीटॉक्सिफिकेशन घडवुन आणावे लागते. डीटॉक्सिफिकेशन चा हेतु शरीरातील डीटॉक्सिफिकेशनची उपजत नैसर्गिक यंत्रणा अधिक परीणामकारक करणे असा आहे.

पण डीटॉक्सिफिकेशन म्हणजे काय हे समजण्यासाठी, आधी टॉक्सिफिकेशन म्हणजे काय हे समजले पाहीजे. दररोजच आपण आपल्या शरीरास अपाय करतील अशा विषारी पदार्थांना नानाप्रकारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश देत असतो. यातील बरेच टॉक्सिन्स सहज समजतील असे असतात उदा – स्वच्छतेसाठी वापरली जाणारी विविध रसायने, वाहनांचे, औद्योगिक प्रदुषण,औद्योगिक वसाहतीमधील, धुके मिश्रित धुर, धुम्रपान इत्यादी. तर काही आपल्या नकळत आपल्या शरीरात प्रवेश मिळवतात. उदा – डोळ्यांना न दिसणारे विषयुक्त रसायने जी न धुतलेल्या भाजीपाला, व फळांसोबत शरीरात प्रवेश करतात, तसेच रेडीमेड खाद्यपदार्थांमध्ये प्रीजर्व्हेटीव्ह म्हणुन वापरली जाणारी रसायने व किटकनाशके.

शुध्दीकरणामध्ये कार्यरत असणारे अवयव
शुध्दीकरणामध्ये कार्यरत असणारे अवयव

ते काय तर आपण जे अन्न खातो, त्यामध्ये देखील किटकनाशके आणि रसायने असतातच कारण अजुन ही भारतात रासायनिक खत व औषधांचा भडीमार पीक वाढीसाठी केला जातो. आपल्यातील डीटॉक्सिफिकेशनची नैसर्गिक क्षमता क्षमता अनेक कारणांमुळे कमी होत असते. यातील मुख्य कारण शरीराला पोषकद्रव्ये न मिळणे आणि एकेक करुन लिव्हर, किडनी छोटी आतडी तसेच मोठी आतडी याचा समावेश असतो. हे च ते अवयव आहेत जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात. पणे असे करण्यासाठी व त्यांनी अपेक्षित काम करण्यासाठी त्यांना आवश्यक ते पोषणमुल्य देखील मिळाले पाहीजे.

आपल्या कडे नेमके याचे विपरीत घडते आहे. आवश्यक पोषक मुल्ये आपण शरीरास देत नाही कारण आपल्याकडे वेळ नसतो. पण त्याच वेळी विषारी टॉक्सिन्स मात्र शरीरात प्रवेश करण्याचे आपण थांबवु शकत नाही. अशा वेळी काय करावे? काय करावे हे समजण्यासाठे आधी आपण हे समजुन घेऊयात की, ही टॉक्सिन्स शरीरात नेमकी प्रवेश करतात तरी कशी?

विषयुक्त रसायनांचा शरीरातील प्रवास

पहीला टप्पा – आपल्या शरीरात हवा, पाणी, कोल्डींक्स, दारु, धुम्रपान, इत्यादी मार्फत टॉक्सिन्स प्रवेश करतात. यात मुख्यत्वे करुन आपण श्वास घेतो ती हवा, आपण खातो ते अन्न, आणि आपली त्वचा या मार्फत विषारी द्रव्ये शरीरात प्रवेश करतात.

दुसरा टप्पा – एकदा का शरीरात प्रवेश मिळाला की, लगेच टॉक्सिन्स चा प्रवास रक्त वाहीन्यांद्वारे यकृताकडे (लिव्हर) होतो.

तिसरा टप्पा – यकृतामध्ये पोहोचल्यावर, या टॉक्सिन्स वर यकृत प्रक्रिया करते.

चौथा टप्पा – टॉक्सिन्स ची हकालपट्टी. – मलमुत्राद्वारे व त्वचेद्वारे हे प्रक्रिया केलेले टॉक्सिन्स शरीरातुन बाहेर फेकले जातात.

बघा, म्हणजे, आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यासाठी लिव्हर ला खुप मोठी काम करावे लागते. आपल्या खाण्यामध्ये जर अधिक फॅट्स , साखर असेल, तसेच मद्यपानाचे प्रमाण जास्त असेल , आपण दिवसातुन अनेक वेळा चहा पीत असाल , तर तुमच्या लिव्हरवर शरीर शुध्दीकरणाचा खुपच ताण येत असतो. व असे नियमित घडल्यामुळे, काही वर्षातच लिव्हर च्या कामामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते. व अशा अवस्थेमध्ये शरीर शुध्दीकरणाचे काम नीट होत नाही.

याचे दुषपरीणाम ताबडतोब आपले शरीर आपणास सांगते. उदा – त्वचा काळसर पडणे, मानेवर, काखेत मोल/मोस येणे, पोटाचा घेर वाढणे, चयापचयाच्या समस्या, श्वासांचा दुगंध येणे, अशा अनेक प्रकारे आपले शरीर आपणास धोक्याची सुचना देत असतेच. पण आपल्या वेळच नसतो, ह्या सुचना ऐकायला.

शरीरात विषारी द्रव्ये आहेतच. व आपणाकडे वेळ नसल्याने आपली मुळ यंत्रणा आपण बिघडवुन ठेवली असेल तर, डीटॉक्सिफिकेशन घडवुन आणावे लागेल. शरीरातील विषाचे हरण, म्हणजे शुध्दीकरण कसे करावे या विषयी माझ्या पुढच्या लेखात वाचा.

धन्यवाद

Please follow and like us:
error

1 Comment

  • कांबळे यशवंत

    June 19, 2019 @ 2:33 am

    खूपच सुंदर लेख आहे वाचून खुप माहिती मिळाली सर आपले अभिनंदन करतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X