सावकाश होऊ द्या – भाग २

सावकाश होऊ द्या

मागील लेखात “सावकाश होऊ द्या” ची भावनिक गरज आणि लोप पावत चाललेली भारतीय ग्रामीण संस्कृती याविषयी आपण पाहीले. जेवण नक्की कसे करावे याविषयी आपले घरातील जाणती माणसे आपल्याला आपण अगदी लहान असल्यापासुनच मार्गदर्शन करीत आली आहेत. आपले दुर्दैव हेच की आपण कधीही त्यांच्या ह्या मार्गदर्शनाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातुन पाहु शकलो नाही. आज मी तुम्हाला तेच, जुन्या जाणत्या माणसांचे ज्ञान सांगणार आहे, त्या सोबत त्याचे आहारशास्त्रातील महत्व काय आहे ते ही आपण पाहुयात.

या लेखात आपण एका वेळच्या जेवणाबाबतच फक्त बोलणार आहोत. संपुर्ण दिवसाचे जेवण कसे काय असावे या विषयी पुन्हा कधीतरी आपण चर्चा करुयात.

  • जेवणापुर्वी हात पाय स्वच्छ धुवावे

आठवल का, मुख्यत्वे करुन आपापल्या वडीलांचा करडा आवाज, आपण लहान असतानाचा? दिवसभर खेळुन दमुन आल्यावर, हात पाय धुवुनच जेवायला बसायची आज्ञा लहानपणी पाळायला जीवावर यायच पण, या छोट्याशा गोष्टीमध्ये खुप मोठे शास्त्र आहे हे आता समजते आहे.

  • जेवण करताना मन प्रसन्न ठेवावे

म्हणजेच काय तर, टिव्ही सिनेमा बघत जेवण करु नये. जेवण हे आपल्या एकंदरीत अस्तित्वासाठी अतिशय महत्वाचे काम असल्याने, त्या ठिकाणी तन आणि मन दोन्ही ही स्थिर झालेले असणे गरजेचे आहे. आपण आपले ऑफीस चे काम किंवा शेतातील काम करताना टिव्ही बघतो काय? नाही ना? मग जेवताना कशासाठी?

  • जेवणापुर्वी आणि नंतर किमान ४० मिनिटे पाणी प्यावे

आयुर्वेदीक महत्व सर्वांना माहीत आहेच, पण त्या ही पेक्षा महत्वाचे म्हणजे पाण्यामुळे भुक तात्पुरती शमते व आपण गरजेपेक्षा कमी अन्न खातो. त्यामुळे जेवणापुर्वी जर किमान ४० ते ५० मिनिटे आधी पाणी प्यायलो तर, जेवणाच्या वेळेपर्यंत आपले पोट पुन्हा रिकामे झालेले असेल व गरजेइतके अन्न आपण खाउ शकु.

  • जेवताना शक्यतो भारतीय बैठकीमध्येच बसावे

भारतीय बैठकीचे महत्व परदेशी लोकांना समजायला लागले आहे
भारतीय बैठकीचे महत्व परदेशी लोकांना समजायला लागले आहे

पुर्वीच्या गावाकडच्या पंगती ज्यांना आठवत असतील , त्यांनी आठवा. पुर्वी लोक पंगतीत बसताना, उकीडवे बसायची. म्हणजे मलविसर्जन करताना आपण जसे, दोन्ही पाय गुडघ्यात मुडपुन बसतो त्या प्रमाणे,  बसायची. असे बसल्या मुळे आपल्या पोटावर ताण येतो व आपण आपल्या भुके पेक्षा दोन घास कमीच जेवण करतो, अशी सर्वसाधारण धारणा होती . तसाच काही तर्क मांडी घालुन बसण्याचा आहे. उकीडवे बसणे हल्लीच्या काळात मॅनरलेस वाटण्यासारखे आहे पण ज्याला आरोग्य सांभाळायचे आहे त्याला ह्याच्या इतका चांगला दुसरा पर्याय नाहीये. अन्यथा मांडीघालुन बसणे देखील ठिक आहे. पण डायनिंग टेबल खुर्ची, ऊभ्याने जेवणे टाळा.

  • खाल्लेला प्रत्येक घास ३२ वेळा चावावा , शर्यत नको

खाल्लेला प्रयेक घास, हळुवार, शांतपणे जास्तीत जास्त वेळा चावा. ३२ वेळा चावला तर सोन्याहुन पिवळे. नुसते शर्यत नको. सावकाश जेवाएवढेच जरी केले तरी सहा महिन्यात बघा काय समाधानकारक परीणाम अनुभवास येतील तुमच्या

  • जेवण झाल्यावर चुळ भरावी

हो. न चुकता चुळ भरणे गरजेचे आहे. मुखाचे आरोग्य देखील फार महत्वाची भुमिका पार पाडते आपल्या एकंदरीत आरोग्य व चुस्तीफुर्तीच्या जीवनावर.

  • जेवणानंतर अर्धातास कोणतेही जड काम करु नये

आपल्या पोटातील सर्वच्या सर्व अवयव अतिशय वेगाने, आपण केलेल्या जेवणाच्या पचनाचे काम आपण खालेल्या पहील्या घासापासुनच सुरु करतात. त्यामुळे आपल्या पोटावर ताण पडेल असे कोणतेच काम आपण किमान अर्ध्हा तास तरी करु नये, जेवण झाल्यावर.

  • स्वीट डीश किंवा डेझर्ट खाणे टाळावे

आपल्या जेवण आणि फलाहारा व्यतिरिक्त, अन्य कोणत्याही मार्गाने आपल्या शरीरात स्टार्च म्हणजे जाता कामा नये. त्यामुळे स्वीट आइसक्रीम वगैरे खाणे जेवणानंतरच नव्हे तर, कधीही टाळावे.

 

या व्यतिरीक्त जर आपणास, वजन कमी करणे, वाढवणे, रेग्युलर हेल्द चेक अप (मोफत), डीटॉक्सिफिकेशन आदी बाबतीत माझी मदत हवी असल्यास बिनधास्त माझ्याशी संपर्क साधा.

 

कळावे,

तुमचे निरामय जीवनाचा सांगाती,

सुनिल व मनिषा कोरडे – 98903 93341/9922830541

 

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X